नेहमी पडणारे प्रश्न
गॅझेटिअर म्हणजे काय ॽ
गॅझेटिअर म्हणजे प्राकृतिक भुखरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या परंपरा, राजघरण्यांचा इतिहास, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील देणारा कोश म्हणजे गॅझेटिअर होय.
गॅझेटिअर व गॅझेट यामधील फरक कोणता ॽ
गॅझेटिअर म्हणजे प्राकृतिक भुखरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या परंपरा, राजघरण्यांचा इतिहास, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील देणारा कोश म्हणजे गॅझेटिअर होय.
गॅझेट म्हणजे राजपत्र, नावात बदल करणे. (शासकीय ग्रंथ भांडार, नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई, 400 004 येथे छापले जाते.)
गॅझेटिअरमध्ये कुठल्या प्रकारचे काम केले जाते ॽ
जिल्हा व राज्य गॅझेटिअर यांची इंग्रजी व मराठी आवृत्ती काढणे, ब्रिटिशकालीन गॅझेटिअरचे पुनर्मुद्रित ग्रंथ, जिल्हा पुरवणी गॅझेटिअर याशिवाय सोर्स मटेरिअल फॉर ए हिस्टरी ऑफ दि फ्रिडम मुव्हमेंट व स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश या विषयांवर गॅझेटिअर लेखन व प्रकाशन विषयक काम केले जाते.
गॅझेटिअर वरील सर्व प्रकाशनांची ग्रंथ विक्री कुठे केली जाते. ॽ
गॅझेटिअर व सर्व प्रकाशनांची विक्री ही अनुक्रमे
१. शासकीय ग्रंथ भांडार नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई- 400 004,
२. शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथ भांडार, पुणे 411 001,
३. शासकीय मुद्रणालय व ग्रंथ भांडार, सिव्हील लाईन्स नागपूर, 440 001,
४. शासकीय मुद्रणालय व ग्रंथ भांडार औरंगाबाद, 421 001,
५. कोल्हापूर शासकीय मुद्रणालय
येथे केली जाते.
दर्शनिका विभाग (गॅझेटिअर डिपार्टमेट) हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. ॽ
दर्शनिका विभाग (गॅझेटिअर डिपार्टमेट) हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
दर्शनिका विभाग (गॅझेटिअर डिपार्टमेट) विभागाच्या कामाचे स्वरुप काय आहे ॽ
गॅझेटिअर ग्रंथाच्या लेखनासाठी या विभागाला विस्तृत व सखोल ऐतिहासिक माहिती गोळा करावी लागते. ही माहिती विखुरलेले जुने अभिलेख, अहवाल, प्रकाशने, पत्रव्यवहार, व्यक्तीगत भेटी तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे गोळा करण्यात येते. जमवलेली सर्व महिती व आधार साहित्याचे वर्गीकरण, सुसूत्रीकरण व तपासणी करून अंतिम संपादन करण्यात येते. काही महत्त्वाच्या विषयांवर विद्वान तज्ज्ञांकडूनही मानधन तत्त्वावर लेखन करून घेण्यात येते. तथापि, बहुतेक लेखन या विभागातील अधिकारी व कर्मचारी करतात. अंतिम संपादनानंतर तयार झालेला सर्व मजकूर संपादक मंडळाच्या सभासंदांकडे छाननी व सूचनांकरिता पाठविला जातो. त्यानंतर त्यास अंतिम स्वरूप दिले जाते.
© दर्शनिका विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे | वापरसुलभता | मदत
संकेतस्थळ मार्गदर्शिका |
Last Upates : 09/01/2026


