आमच्या विषयी
आमच्या विषयी
गॅझेटिअर म्हणजे प्राकृतिक भूस्वरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भोगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती राजघराण्याचा इतिहास, अर्थव्यवस्था, महसूल, प्रशासन आणि पुरावशेषांचा तपशील देणारा कोष हि गॅझेटिअरची मूळ संकल्पना. एक भोगोलिक कोष या प्रारंभिक संकल्पनेपासुन ब्रिटिशांनी आपल्या अधिकाऱ्यांना प्रशासनासाठी एतद्देशीयांची माहिती पुरवणारा एक उपयुक्त ग्रंथ म्हणून गॅझेटिअरची निर्मिती केली.
दर्शनिका / गॅझेटिअर
३१ ऑक्टोबर १९६४ रोजी दर्शनिका विभाग (गॅझेटिअर डिपार्टमेंट ) हा एक स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन करण्यात आला असुन ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे. या विभागाकडून इंग्रजी व मराठी भाषांमधून खालील सहा मालिकांमध्ये गॅझेटिअर ग्रंथ प्रकाशित केले जातात.
१. ब्रिटिशकालीन जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी ) ग्रंथांचे पुनर्मुद्रण ब्रिटिशकालीन जिल्हा गॅझेटिअर ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचा संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासक उपयोग करतात. यामध्ये २६ ग्रंथाचे पुनर्मुद्रण करून ते प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
२. जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ (इंग्रजी-सुधारित आवृत्ती) या मालिकेत राज्यातील पूर्वीच्या २६ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक व बृहन्मुंबईसाठी ३ असे एकूण २८ ग्रंथ इंग्रजी भाषेतून प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
३. जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ (मराठी) राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ मराठीतून प्रकाशित करण्याची हि मालिका आहे. साधारण १००० ते १२०० पृष्ठांच्या या ग्रंथात नव्या दृष्टिकोनातून सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील स्थित्यंतरे व दूरगामी बदल यांच्या माहितीबरोबर जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वतंत्र आंदोलन, भूगोल, लोक, अर्थव्यवस्था, प्रशासन, नियोजन, व्यापार, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थेळे या विषयांवर सखोल माहिती देण्यात येते. आतापर्यंत या योजनेंतर्गत परभणी, वर्धा, कोल्हापूर, रायगड, जळगाव, सातारा नागपूर (भाग १ व २ ), लातूर (भाग १ व २), नांदेड (भाग १ व २) व बुलडाणा (भाग १ व २) जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. तर चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटिअर काम सुरु आहे.
४. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (मराठी व इंग्रजी) ज्या विषयावर जिल्हा पातळीपेक्षा राज्य पातळीवर उत्तमरीत्या लेखन होऊ शकते अशा विषयांवर राज्य गॅझेटिअर ग्रंथ इंग्रजी व मराठीतून प्रकाशित करण्याची हि मालिका आहे. या मालिकेंतर्गत १७ राज्य गॅझेटिअर प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच यात्रा व उत्सव (कोकण विभाग), भाषा व वाङ्मय, फॉऊंना, काष्ठ वनॊपज यांचे काम सुरु आहेत.
५. सोर्स मटेरियल फॉर दि हिस्टरी ओफ फ्रीडम मुव्हमेंट : भारतीय स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्याचे प्रकाशन या मालिकेखाली स्वातंत्र्य आंदोलनासंबंधीचे दस्तऐवज, अभिलेख व इतर महत्वाची कागदपत्रे इंग्रजी भाषेतून प्रकाशित करण्याचे काम दर्शनिका विभागाकडून केले जाते. इतिहासकार व अभ्यासक यांना उपलब्ध नसलेले गृह विभाग, मुंबई पोलीस आयुक्त व महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातील गोपनीय अभिलेख व दस्तऐवज तसेच महाराष्ट्र राज्य पुराभिलेख, भारत सरकारचे राष्ट्रीय अभिलेखागार इत्यादींकडून प्राप्त केलेले अभिलेख प्रसिद्ध करावयाची हि योजना आहे. या योजनेंतर्गत १३ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत.
६ स्वातंत्र्य सैनिक म्हणजे केवळ ज्यांनी तुरूंगवास भोगला आहे अशी व्याख्या न करता स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे सहभाग होता, ज्यांनी हाल सोसले तो स्वातंत्र्य सैनिक अशी व्याख्या करून त्यांचा समावेश या चरित्रकोशात करून ते प्रकाशित करण्यात आले.
© copyright 2021. All rights reserved Privacy Policy